मी कंटाळलोय, माझे जीवन संपवतोय, आत्महत्येपूर्वी पोलीस FB Live मध्ये ढसाढसा रडला

गेल्या काही दिवसांपासून देशातील पोलिस दलात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे. यामध्ये वरिष्ठांना कंटाळून तसेच वरिष्ठांच्या दबावापुढे कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

तसेच भ्रष्टाचार, लाच यासारखी अनेक प्रकरणे पोलिस दलात घडत आहेत अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून येथील एका पोलिसाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे.

यामुळे राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे पोलीस शिपाई जितेंद्र चौहान असे त्यांचे नाव आहे. त्यांनी डोक्याला गोळी मारून आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. पीलीभीतच्या बीसलपूर कोतवाली येथे ही घटना घडली आहे.

पोलीस विभागात होत असलेल्या छळाला कंटाळून जितेंद्रने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्रने फेसबुक लाईव्ह केले होते. पोलीस विभागातील छळाने कंटाळलोय असे सांगत त्यांनी आपले आयुष्य संपवले आहे.

जितेंद्र चौहानच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस विभागावर टीका होत आहे. जितेंद्र चौहान २०१६ मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले होते. पीलीभीतच्या मार्गावर जितेंद्र चौहान यांचा मृतदेह कारमध्ये मृत अवस्थेत सापडला. त्यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

त्याच्या मृतदेहजवळ कोणतेही हत्यार सापडले नाही, यामुळे त्यांनी आत्महत्या कशी केली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या कुटूंबात वाद होते, असेही बोलले जात आहे. पुढील तपास सध्या सुरू आहे.

जितेंद्र चौहान यांनी फेसबुक लाईव्ह करत रडत रडत व्हिडीओ बनवला होता. त्यात तो म्हणत होता की, मी खूप कंटाळलोय, माझी जगण्याची इच्छा नाही मी आत्महत्या करायला चाललोय असं ते सांगत होते.

ताज्या बातम्या

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत आहे माधूरी दिक्षितचा ३६ चा आकडा; जाणून घ्या कोण कोण आहेत त्या अभिनेत्री

सोलापुरात कोरोना नियमांची ऐशी तैशी; काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला जमली तुफान गर्दी 

विराटच्या मदतीला धावला सलमान; इंग्लंडच्या माजी कप्तानाला झापत केली विराटची पाठराखन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.