दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांचा अर्धनग्न व्हिडीओ झाला व्हायरल

बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी महिलांना बुरखा घाला असा सल्ला दिला आहे. तेव्हापासून इम्रान खान सोशल मिडीयावर खुप ट्रोल होत आहेत. त्यांच्या या विधानावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

इम्रान खान म्हणाले होते की ज्याप्रकारे फक्त कायदे करून भ्रष्टाचार संपत नाही त्याच प्रकारे बलात्काराच्या घटना जनतेच्या सहकार्याशिवाय संपणार नाहीत. आम्हाला पडदा पद्धतीची संस्कृती वाढवावी लागेल जेणेकरून मोह टाळता येईल असेही आश्वासन त्यांनी केले होते.

तसेच त्यांनी अश्लीलतेसाठी भारत आणि युरोपला दोष दिला. ते म्हणाले की दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणतात आणि युरोपमध्ये अश्लील गोष्टींनी त्यांची कौटुंबिक व्यवस्था उध्वस्त केली आहे. म्हणून पाकिस्तानच्या लोकांनी अश्लीलतेवर मात करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे इम्रान खान म्हणाले होते.

यानंतर ते ट्वीटरवर ट्रोल झाले आहेत. एका व्यक्तीने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते बीचवर एका महिलेसोबत बिकीनी पोशाख घालून अंघोळ करत आहेत. त्यामध्ये त्या व्यक्तीने कॅप्शन दिले आहे की इम्रान खान बुरख्यावर व्याख्याने देत आहेत पण स्वता मात्र अशाच एका बिकीनी पोशाखात बाईसोबत अंघोळ करताना दिसत आहेत.

जेव्हा इम्रान क्रिकेट स्टार होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानमध्ये बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी त्यांनी तेथे कडक नियम बनवले आहेत. या कायद्याअंतर्गत गुन्हेगार आरोपीस औषध देऊन नपुंसक बनवता येऊ शकते. सुनावणीसाठी देशभरात न्यायालये स्थापन केली जात आहेत. ज्याची सुनावणी चार महिन्यांच्या आत करावी लागते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.