मर्डर चित्रपट पाहिल्यानंतर इम्रान हाश्मीच्या पत्नीने दिली होती ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रिया

आज आम्ही तुम्हाला इम्रान हाश्मीच्या आयुष्यातील एक भन्नाट किस्सा सांगणार आहोत. आज त्याचा वाढदिवस आहे त्यानिम्मित्ताने आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या नवऱ्याने जर परस्त्रीकडे वाकडी नजर करून जरी पाहिले तरी बायकांना खुप राग येतो.

इम्रान हाश्मी तर प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन देत असे विचार करा त्याच्या बायकोला किती राग येत असेल. असाच एक किस्सा त्याच्यासोबत घडला होता. आता सगळ्यांनाच माहिती आहे की इम्रान हाश्मीला सिरीअल किसर म्हणतात.

तो चित्रपटात किसिंग सीन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या गोष्टीचा प्रभाव त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडत होता. त्याचा मर्डर हा चित्रपट पाहून त्याची पत्नी परवीन साहनी प्रचंड रागावली होती.

इम्रानने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत २००३ साली लग्न केले होते. आता मर्डर चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की त्या चित्रपटात किती इन्टिमेट सिन आहेत. ते पाहून त्याच्या पत्नीचा राग अनावर झाला होता.

चित्रपट पाहताना तिने इम्रानचा हात घट्ट पकडला होता. त्यातील काही सीन पाहून तिने इम्रानचा हात इतका जोरात आवळला की तिच्या हाताची नखे इम्रानच्या हातात घुसली होती. त्याच्या हातातून रक्त येऊ लागले होते.

हा खुलासा स्वता इम्रानने एका मुलाखतीत केला आहे. इम्रान असेही म्हणाला होता की, परवीन बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहायलाच आवडते. सुरूवातीला तिला इम्रानचे हे सीन पाहून खुप राग यायचा.

पण थोड्या दिवसांनी कळले की हा इम्रानच्या कामाचा एक भाग आहे. परंतु तिने इम्रानला सहजासहजी हे सीन करण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यासाठी इम्रानला तिला लाखो रूपयांची खरेदी करून द्यावी लागते.

इम्रानला प्रत्येक किसिंग सीननंतर तिला एक महागडी हॅन्डबॅग घेऊन द्यावी लागते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आता इम्रानच्या पत्नीकडे किती हॅन्डबॅग गोळा झाल्या असतील. इम्रानला आमच्या टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महत्वाच्या बातम्या
अमृता खानविलकरचा कातिलाना अंदाज; फोटो सोशल मिडीयावर झाल्या व्हायरल
प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात तुमचाच विचार होता,पप्पा ही खेळी तुमच्यासाठीच’
उपचाराअभावी पतीचा मृत्यु झाल्यामुळे तिने भाजी विकून गावात उभे केले मोठे रुग्णालय
गायी म्हशी न पाळता ही महिला करतेय शुद्ध तुपाची निर्मिती अन् कमवतेय लाखो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.