चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिल्यानंतर बायकोचा मार खायचा इम्रान हाश्मी; स्वतः केला खुलासा

बॉलीवूडचा सिरीयल किसर म्हणून इम्रान हाश्मीची ओळख आहे. त्याने चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच किसिंगने देखील चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. तो त्याच्या किसिंग सीनमुळेच जास्त प्रसिद्ध आहे. इम्रानचा चित्रपट असेल तर मग त्यात किसिंग सीन मात्र असणारच.

इम्रानने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘किसिंग सीन देणे त्याची आवड नाही. पण चित्रपटासाठी त्याला ते करावे लागते. प्रेक्षकांना देखील त्याच्याकडून त्याच अपेक्षा असतात. म्हणून किसिंग सीन देणे त्याची गरज आहे’.

पण याच किसिंग सीनमूळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा वादळ येतात. या गोष्टीवरून त्याचे त्याच्या पत्नीसोबत अनेक वेळा भांडण झाले होते. पण तरीही तो काही करू शकत नव्हता. कारण किसिंग सीन चित्रपटांची गरज असतात.

इम्रानने सांगितले की, ‘करिअरच्या सुरुवातीला तो चित्रपटात किसिंग द्यायचा त्यावेळी त्याला मार खावा लागायचा. किसिंग सीन देऊन घरी गेल्यानंतर त्याची बायको त्याला बॅगने मारायची. त्यानंतर त्याला बायकोला नवीन बॅग घेऊन द्यावा लागायचा. आज त्याच्या घरात बॅगांसाठी वेगळी रूम बनू शकते’.

यावरून समजू शकते की, इम्रानने त्याच्या बायकोकडून किती मार खाल्ला आहे. पण तरीही त्याने किसिंग सीन देणे बंद केले नाही. तो आजही चित्रपटांमध्ये किसिंग सीन देतो. आत्ता वेळेनुसार त्याची पत्नी देखील समजूतदार झाली आहे. त्यामुळे ती त्याला काही बोलत नाही.

इम्रानने बॉलीवूडमध्ये आल्यानंतर लगेच लग्न केले होते. कारण त्याचे त्याच्या पत्नीवर खुप प्रेम होते. एवढे वर्ष झाली तरी तो आजही त्याच्या पत्नीसोबत खुप आनंदी आहे. आज तो मोठा स्टार झाला आहे. लवकरच त्याचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘शिवाजी द बॉस’ चित्रपटातील सुपरस्टार अभिनेते विवेक यांचे निधन

सकाळी नऊच्या शिफ्टला रात्री आठ वाजता यायचे राजेश खन्ना आणि वडापाव खायचे; अभिनेत्रीने केला खुलासा

एकेकाळी मुंबईच्या चाळीत सिंगल रुममध्ये राहणाऱ्या पंकज त्रिपाठीने आज मुंबईमध्ये खरेदी केले करोडोंचे घर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.