ते ८० हजार कोटी कोणाचे? भली मोठी रक्कम वारसदार नसल्याने आहे तशीच पडून…

एम्प्लॉइज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने धक्कादायक खुलासा केला असुन पी एफ खात्यात २०,४०० कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा असून या रक्कमेचे कोणी वारसदार आणि दावेदार नाही.

बँकेत सुद्धा अश्या अनेक मुदत ठेवी आहेत ज्यांचे दावेदार मुदत संपल्यानंतर देखील आले नाही आहेत. अश्या प्रकारे एकूण ८०,००० कोटी पेक्षा अधिक रक्कम अशीच पडून आहे जिचं कोणी मालक नाही.

देशात EPFO ​​कडे सुमारे 26,497 कोटी रुपये, सर्व बँक खात्यांमध्ये 18,381 कोटी रुपये, म्युच्युअल फंडांमध्ये 17,880 कोटी रुपये आणि विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये पडून आहेत. फिक्स मुदत ठेवींमध्ये 4,820 कोटी रुपयांच्या अघोषित ठेवी जमा आहेत. ज्यांना अजून कोणी दावेदार नाही.

नेमका या बेवारस रकमेचे काय करायचे त्यावर झीरोधा या ब्रोकिंग फर्मचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी उपाय सांगितला आहे. झीरोधाने एक अलर्ट फिचर चालू केले आहे जे डिमॅट खाते निष्क्रिय असल्यास सदर व्यक्तीला कळवेल.

अश्या प्रकारचे फिचर लवकरच बँका स्वीकारतील जेणेकरून अश्या बेवारस रकमेची समस्या उद्भवणार नाही अशी अपेक्षा कामत यांनी व्यक्त केली. रकमेचा दावेदार न होण्याचे एक प्रमुख कारण हे असू शकते की नामनिर्देशित व्यक्तीला याची माहिती नसते असे कामत यांचे मत आहे.

झिरोधाने आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा दिली आहे की ज्या अंतर्गत खातेधारक त्यांच्या खात्यात ऑनलाईन नॉमिनी जोडू किंवा बदलू शकतात. एवढेच नाही तर जर एका वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यामुळे डिमॅट खाते निष्क्रिय झाले तर त्याची माहिती संबंधित व्यक्तीला एसएमएस किंवा ईमेलद्वारे दिली जाईल.

 

महत्वाच्या बातम्या
मराठमोळी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शेअर केला मुलीसोबतचा फोटो, फोटो बघून घायाळ व्हाल..
“महिंद्रा है तो मुमकिन है”! ५ फूट पुराच्या पाण्यातून सुसाट निघालीय बोलेरो; पाहा व्हिडिओ
मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार
कुत्र्यांना खाऊ घालत होते चिमुकले, अचानक इमारत कोसळली अन् आईसमोरच गेला दोन्ही मुलांचा जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.