सतत बॉसला नाव ठेवणारे कर्मचारी आपण पाहिले आहेत. आणि बॉसनेही पगारीसाठी कर्मचाऱ्यांना त्रास दिलेला आपण पाहिला आहे. पण आज आम्ही तुम्हाला अश्या बॉस विषयी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना करोडपती बनवले आहे.
बिझनेसमन मॅथ्यू मोल्डिंगने असे कार्य केले आहे की प्रत्येकजण त्यांचे कौतुक करीत आहे. ब्रिटीश व्यावसायिकाने आपल्या कंपनीच्या नफ्यातील शेअर कर्मचार्यांमध्ये वितरीत केले आहेत.
ब्रिटनमध्ये मॅथ्यू मोल्डिंगने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक धोरणांबाबत असा काही निर्णय घेतला, की सर्व कर्मचाऱ्यांना लॉटरी लागल्याची अनुभूती मिळाली. द हट ग्रुप असे या कंपनीचे नाव असून ही कंपनी मॅथ्यू मोल्डिंग यांच्या मालकीची आहे. या व्यावसायिकाने चक्क आपल्या कंपनीचे प्रॉफीट शेअर्स कर्मचाऱ्यांच्या नावावर केले.
मॅथ्यूने आपल्या कंपनीच्या नफ्यातून कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये ८३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ८१८३ कोटी रुपयांचे शेअर्स वितरित केले. त्यांनी एक अनोखी स्कीम चालवली. ही स्कीम सर्व कर्मचाऱ्यांसाठी ठेवली होती. या स्कीमचा फायदा घेणाऱ्यांमध्ये कंपनीचा ड्रायव्हर तर मालक मॅथ्यू यांची सेक्रेटरीही आहे. तिला इतके पैसे यामध्ये मिळाले कि ती वयाच्या ३६ व्या वर्षीही निवृत्ती घेऊ शकते.
२००४ मध्ये मॅथ्यू मोल्डींग यांनी जॉन गॅलमोर यांच्या सोबत द हट ग्रुपची सुरूवात केली होती. गेल्या सोळा वर्षात मॅथ्यू यांना खुप फायदा झाला. त्यानी आतापर्यंत १.१ बिलीयन डॉलर म्हणजेच ८१२२ करोड रूपयांचा बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.