Share

Pradeep Patwardhan : पतीच्या निधनानंतर प्रचंड दुखाःत बुडालीय प्रदीप पटवर्धनांची घटस्फोटीत पत्नी; म्हणाली ते खूप लवकर…

Pradeep Patwardhan Suvarnareha Jadhav

Pradeep Patwardhan  : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ९ ऑगस्टला निधन झाले. गिरगावमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी प्राण सोडला. आतापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन व त्यांची पूर्वाश्रमिची पत्नी सुवर्णरेहा जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे. श्रीतेजने दुःखद प्रसंगात धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले आहे.

सुवर्णरेहा जाधव यांनीदेखील त्यांच्या पोस्टद्वारे दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘९ ऑगस्ट २०२२ रोजी माझा मुलगा श्रीतेजचे वडील आणि माझे पूर्वाश्रमीचे पती प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची घोषणा करताना अंतःकरण भरून आलं आहे. प्रदीप एक चांगले वडील होते आणि ते माझे खूप चांगले मित्रही होते.

एक यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून त्यांनी फक्त रंगभूमी व सिनेसृष्टीतच नाही तर आपल्या प्रियजनांच्या मनातही कायमचा ठसा उमटवला. ते खूप लवकर आपल्यापासून दूर गेले. ते कायम आठवणीत राहतील,’ असेही सुवर्णरेहा या पोस्टद्वारे म्हणाल्या.

तसेच श्रीतेजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ च्या सुमारास माझे वडील कै. प्रदीप शांताराम पटवर्धन यांचे आमचं झावबावाडी, गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.’

पुढे त्याने लिहिले की, त्यांच्यावर त्याचदिवशी दुपारी ३ वाजता चंदनवाडी, गिरगाव येथील स्मशानभूमीत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व विधी त्यांचा एकुलता एक मुलगा या नात्याने मी उपस्थित कुटुंबियांच्या समवेत पार पाडले. माझ्या वडिलांचे हे असे अचानक जाणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. वयाच्या ६५ व्या वर्षीसुद्धा ते अत्यंत सक्रिय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशीशीही ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते.

तसेच, आमच्यावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहणाऱ्या सर्वांचेच मी मुलगा श्रीतेज पटवर्धन, माझी पत्नी निकिता पटवर्धन, माझी आई सुवर्णरेहा जाधव आणि माझे काका सुधीर शांताराम पटवर्धन ऋणी आहोत. माझ्या वडिलांचे, त्यांचं कार्यक्षेत्र आणि अभिनय यावर निस्सीम प्रेम होतं. कायमच त्यांनी रंगभूमीची सेवा मनोभावे केली. त्यांचे हेच विचार आम्हां सर्वांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे कारण, ‘द शो मस्ट गो ऑन.’

महत्वाच्या बातम्या
Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल आणि त्याची बायको धनश्री यांच्यात ‘या’ खेळाडूमुळे आलाय दुरावा? चर्चांना उधान
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ
डॉल्बीवरुन उदयनराजे भडकले; म्हणाले, ‘दोन तासांत काय आभाळ कोसळणार का?’
मंत्रिपद न दिल्याने नाराज असलेले आमदार पुन्हा बंडखोरी करणार? नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now