अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विक्की जैनसाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली, तु जगातला बेस्ट…

मुंबई । सुशांतसिंग राजपूत आत्महत्याला एक वर्ष पूर्ण झाले, तरी त्यांची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली अजूनही स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या काही चाहत्यांनी अंकिता लोखंडेवर टीका करायला सुरुवात केली होती. मात्र, अंकिताने कोणाकडे लक्ष दिले नाही.

सुशांतसिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी अंकिताने सुशांतच्या आठवणीत बरेच व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर तिने तिचा बॉयफ्रेंड विक्की जैन याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. यात तिने बॉयफ्रेंड विक्की जैनला जगातला सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड म्हटले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

अंकिताने यात लिहले आहे की, डिअर विक्की, तु माझ्यासोबत तेव्हा होतास जेव्हा मी संकटात होती. त्यावेळी ‘तु कशी आहेस? तुला कोणत्या मदतीची गरज आहे का? तुला कुठे बाहेर जायचंय का? म्हणजे तुला जरा मोकळे वाटेल.’ असे मला विचारणारा तु पहिलाच व्यक्ती आहेस. तु प्रत्येक वेळी माझी चिंता करत होतास आणि मी प्रत्येक वेळी म्हणत आले की ‘मी ठीक आहे’. कारण मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहेस. मला तुझे आभार मानायचे आहेत. कारण तु जगातला सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड आहेस.

मला काय हवय हे तुला सांगायची कधी गरज पडत नाही. तुला नेहमीच न बोलता कळते. तुझे खरेच खूप आभार. मला प्रत्येक वेळी एका राणीप्रमाणे ठेवलेस यासाठी, कितीही महत्त्वाचे काम असले तरी माझ्यासाठी वेळ काढतोस. माझ्या कुटुंबीयांसोबत नाते तयार केलेस यासाठी. आणि माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत हॅंगआऊट केलेस यासाठी सुद्धा. यापुढे अंकिता लिहले माझ्यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

आपण दोघांनीही आयुष्यात भरपूर चढ-उतार पाहिलेत. तु मला विश्वास दिला होतास की एक दिवस सगळे काही सुरळीत होईल. तु नेहमीच दिलेला शब्द पूर्ण केलास आणि आज माझ्यासोबत आहेस. या सगळ्या कारणांसाठी मी तुझी कायम आभारी असणार आहे. मी पहिल्यापेक्षा आणखी जास्त तुझ्या प्रेमात पडले आहे. अशा अनेक गोष्टी अंकिताने आपल्या पोस्टद्वारे म्हणाली आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

पुण्यातील चिमुकल्या वेदीकाला आज दिले ’16 कोटींचे’ इंजेक्शन, कुटुंबीय आनंदाने गेले भारावून

दयाभाभीचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल चकित; सोशल मिडीयावर डान्स व्हिडिओ घालतोय थैमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.