महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; चक्क काँग्रेसनेच केली पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई । राज्यात कोरोनाने परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. यातच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

देशमुख यांनी याबाबत नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. सध्या काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत सहभागी आहे. यामुळे आशिष देशमुख यांच्या या घरच्या आहेरामुळे आता विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जाण्याची शक्यता आहे.

याबाबत आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे ६० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

सर्व परिस्थिती बघता संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशी मागणी त्यांनी मोदींकडे केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्याने अशी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढे अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. आता काँग्रेसचे बडे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निर्णय प्रकियेत देखील अनेकवेळा मतभेद निर्णय झाले आहेत. आता विरोधक देखील टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.

ताज्या बातम्या

एकाच वेळी ५०० लोकांचा गेला असता जीव; पण अखेरच्या क्षणात घडला ‘तो’ चमत्कार

मंदिर निर्माण होतंय, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागू नका; स्वरा भास्करची मोदींवर जोरदार टीका

विराट कोहलीने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलेच नव्हते, अशी जमली होती लव्हस्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.