इलॉन तुम्ही चार कंपन्या कशा सांभाळता? भारतीय व्यक्तीच्या प्रश्नाला इलॉन मस्कचे भन्नाट उत्तर  

मुंबई | स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क सतत चर्चेत असतात. कधी क्रिप्टोकरेंसी तर कधी ऑनलाइन प्रायव्हसी संबंधी केलेली वक्तव्यांमुळे त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

क्रेड कंपनीचे संस्थापक कुणाल शहा यांनी इलॉन मस्क यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचे भन्नाट उत्तर इलॉन यांनी दिले यामध्ये ते स्वत:ला ‘एलियन’ म्हणतात. कुणाल यांनी ट्विट करत इलॉन यांना प्रश्न विचारला होता.

कुणाल यांनी इलॉन तुम्ही इतके मोठे व्यवसाय कसे सांभाळता. अशा आशयाचे प्रश्न विचारणारे ट्विट केले होते. तसेच कुणाल यांनी इलॉन यांना तुम्ही हे ट्विट पाहिले तर त्याचे उत्तर नक्की द्या असेही अग्रहाने म्हटले होते.

 

मस्क यांनी याचे उत्तर दिले आहे. यावर ते म्हणतात, कारण मी एक ‘एलियन’ आहे मस्क यांच्या या उत्तरावर अनेक लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. मस्क यांच्या उत्तरावर एकाने म्हटले आहे की, आम्हाला तर माहित आहे तुम्ही एलियन आहे, काही नवीन सांगा. दुसऱ्याने म्हटले आहे शेवटी सत्य समोर आलेच तसेच आणखी एका युझरने म्हटले आहे यामुळे तर मस्क दुसऱ्या ग्रहावर जग स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

दरम्यान, मस्क यांची इलेक्ट्रीक कार असणारी कंपनी टेस्लाच्या शेअर किंमतीत अचानक वाढ झाली. ही वाढ ४.८ इतकी होती. त्यामुळे ब्लुमबर्गच्या अहवालानुसार इलॉन मस्क १८८.५ बिलियन डॉलरच्या संपत्तीसह जगातील ५०० सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या स्थानावर पोहचले होते. त्यांनी ऍमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांना श्रीमंतीत मागे टाकले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.