शिक्षण पण घ्या आणि करिअरसुद्धा घडवा: डिग्री नसलेल्या मुलांना टेस्ला करणार भरती

भारतात डिग्री नसलेल्या मुलांना नोकरी मिळणे असंभव आहे. तर दुसरीकडे टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी एक निर्णय घेतला आहे. त्यांनी असे ठरवले आहे की ज्या मुलांचे शिक्षण चालू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे डिग्री नाहीये अशा विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

अमेरिकेत जे विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना टेस्ला भरती करणार आहे. ऑस्टीन शहरात आपल्या गीगा फॅक्ट्रीमध्ये १० हजार पदांची भरती होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार येथे नोकरी मिळवण्यासाठी डिग्रीची आवश्यकता नाही.

एलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे २०२२ पर्यंत या प्लांटमध्ये लोकांना कामावर ठेवले जाईल. यामागे कंपनीचा हेतू आहे की शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण घेता घेता रोजगार उपलब्ध व्हावा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क या कंपनीमध्ये साडेसात हजार कोटी रूपये खर्च करणार आहेत.

मागच्या वर्षी या कंपनीमध्ये ५ हजार स्टाफची भरती होणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती पण आता या संख्येला चार पट वाढविण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीने ऑस्टीन शहरातील कॉलेज, टेक्सास विश्वविद्यालय, डेल वेल स्कूल इत्यादी शिक्षण संस्थांना संपर्क केला आहे.

कंपनी त्या मुलांनासुद्धा भरती करणार आहे ज्यांना शाळा शिकताना टेस्लामध्ये आपले पुढचे करिअर करायचे आहे. दरम्यान भारतातही असा काही उपक्रम टेस्ला राबवते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लवकरच टेस्ला भारतात आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन सुरू करणार आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय का, त्यांच्यावर राज्य आलंय; राज ठाकरेंचा टोला
बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी
तारक मेहता मालिकेतील अभिनेत्याला सोनसाखळी चोरी प्रकरणी अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल
अजब प्रेमकी गजब कहाणी! पोरगाच बनला बापाचा साडू, मावशीसोबत पळून जाऊन केले लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.