‘हिंदू समाज सडलेला आहे’, एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीचे वादग्रस्त वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल

पुणे | पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या शर्जील उस्मानीने हिंदू समाजाविषयी वादग्रस्त भाषण दिले आहे. ‘हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे आणि भारतात मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे’ असं वक्तव्य शर्जील उस्मानी या विद्यर्थी नेत्याने केले आहे.

एल्गार परिषदेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मीडियानेही हे प्रकरण लावून धरल्यानंतर भाजपाने यावर कारवाईची मागणी केली आहे.

शर्जील उस्मानी हा अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. यापुर्वी त्याने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे तो चर्चेत आला होतो. पुण्यात त्याने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

‘आज हिंदुस्थानमधील हिंदू समाज सडलेला आहे. आता कोणत्याही कारणांची गरज वाटत नाही, मुसलमान आहात मारून टाकतील, गोष खाताय मग ते बकरी, चिकन, बीफ आहे, काही फरक पडत नाही मारून टाकतील. रेल्वेने प्रवास करताय, बसलाय सीट मागितली म्हणून मारतील, सीट दिली तरी मारतील. दोन हजार रुपयांच्या बछड्याची चोरी झाली की माणसांचा जीव घेतला’. असे शार्जीलने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहेत.

 

https://twitter.com/ek_aalu_bonda/status/1355568796203966466?s=20

पोलिसांनी ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्याची परवानगी दिली होती. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. तसेच अरुंधती रॉय, कन्नन गोपीनाथन, विद्यर्थी नेता शर्जील उस्मानी आणि पत्रकार प्रशांत कनोजिया यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या-
एल्गार परिषदेला झटका; पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली
हेच ऐकायचं बाकी होतं! ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच’; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा
लोकल फॉर व्होकल! शेणापासून बनवलेल्या पेंटला देशभरात मिळतोय प्रतिसाद
कंगणाचा पुन्हा कांगावा! नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विट करत म्हणाली….

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.