VIDEO: फटाकांच्या आवाजांमुळे हत्ती संतापला, वरातीत आलेल्या लाखो रुपयांच्या गाड्यांचा केला चुराडा

सध्या सगळीकडे लग्न सोहळे सुरु आहे. त्या लग्नातले नवरी-नवरदेवाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आता एका लग्नातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

भारतात लोकं लग्नामध्ये मोठ्याप्रमाणात खर्च करताना दिसून येतात. अनेक लोकं लग्न धुमधडाक्यात व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात. पण असे करणे लग्नसोहळ्यात आता चांगलेच महागा पडले आहे. कारण एका हत्तीने वरातीमध्ये तांडव करुन पुर्ण लग्नच बिघडवलं आहे.

संतापलेल्या हत्तीने या लग्नात मंडपाची नासधूस करत पाहूण्यांच्या गाड्यांचा चुराडा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील आहे.

लग्नात फटाकांच्या आवाजामुळे हत्ती चांगलात संतापला आहे. त्यामुळे त्याने लग्नाची पुर्णपणे नासधूस केली आहे. संतापलेल्या हत्तीला बघून नवरदेवाला सुद्धा त्य ठिकाणाहून पळ काढवा लागला आहे. या घटनेमुळे त्याठिकाणी बराचवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

शुक्रवारी रात्री उशिरा हे लग्न पार पडले पण संतापलेल्या हत्तीने लग्नात आलेल्या अनेक महागड्या गाड्यांचा चुराडा केला आहे. तसेच या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे.

जेव्हा वराचे आणि पाहूण्यांचे स्वागत होत होते. त्यावेळी काही लोकांनी फटाके फोडले. बराचवेळ फटाक्यांचा आवाज येत होता, त्यामुळे हत्ती बिथरला आणि लग्नात दिसेल त्या गोष्टींवर धावून गेला. तो समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पायाखाली चिरडत होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लागीर झालं फेम आज्याचा धम्माल डान्स विडिओ बघितला का? पाहा जबरदस्त विडिओ
तुमच्या पायाला ‘या’ समस्या जाणवत असतील तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार, वाचा..
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.