मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी २८ हजार रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली । कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण खासगी वाहनातून जास्त प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. जेणेकरून सार्वजनिक वाहनांमधील गर्दीच्या ठिकाणी असणारा कोरोनाचा धोका टाळता येईल, असा प्रत्येकाचा प्रयत्न आहे.

मध्यंतरी लॉकडाऊनमुळे विक्री मंदावल्याने दुचाकी आणि चारचाकी स्वस्तही झाल्या होत्या. अशातच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वाहनांनी प्रवेश केला होता. इंधनाचे वाढलेले दर पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने ही काळाची गरज बनली आहे.

त्यामुळे आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आणला आहे.

भारतात इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकारकडून नुकतेच FAME II नियमात सुधारणाही करण्यात आल्या. त्यामुळे देशात इलेक्ट्रॉनिक वाहने आणखी स्वस्त होऊ शकतात. FAME II नियमात सुधारणा झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर जादा अनुदान मिळेल.

यापूर्वी इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर प्रति kwh १० हजार रुपये अनुदान मिळत असे. आता त्यामध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. मोदी सरकारच्या निर्णयानंतर TVS कंपनीने TVS iQube इलेक्ट्रॉनिक स्कुटरची किंमत कमी केली आहे.

या स्कुटरची किंमत ११,२५० रुपयांनी कमी झाली आहे. तर Okinawa ने Okinawa iPraise+ या इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या मॉडेलची किंमत ७,२०० ते १७,९०० रुपयांनी घटवली आहे. Revolt Motors कंपनीच्या RV ४०० इलेक्ट्रॉनिक बाईकच्या किंमतीत २८,२००रुपयांची कपात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

अरेरे! नवऱ्याला घोड्यावर चढता आलं नाही म्हणून नवरीने भर मंडपात दिला लग्नाला नकार

भल्याभल्यांना नडणाऱ्या कंगणाबाबत ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली ‘ही’ गोष्ट; पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मोठी बातमी! आयपीएलनंतर भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपही रद्द, आता या देशात रंगणार सामने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.