दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक टू- व्हिलर घेताय.? या ५ गाड्या आहेत उत्तम पर्याय

पुणे । देशभरात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण वाहन खरेदी करतात. सणासुदीचे दिवस शुभ मानले जातात आणि म्हणूनच नवनवीन गोष्टींची खरेदी या काळात केली जाते. भारत सरकारने प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने नवीन नियम लागू केले आहेत. BS-६ नॉर्म्स बंधनकारक करण्यात आले असून सरकार इलेक्ट्रिक गाड्यांवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे.

इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. दुचाकी वाहनांमध्ये बजाज, एथर, टीव्हीएस या सारख्या मोठ्या कंपन्यांनी उत्तम इलेक्ट्रिक दुचाकींचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

यामध्ये ओकिनावा आय – प्रेज ओकिनावा हे इलेक्ट्रिक दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांमधील एक मोठे नाव आहे. आय – प्रेज ही त्यांची नवीन गाडी असून त्यामध्ये ३.३ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण चार्जमध्ये १६० किमी पर्यंत अंतर पार करता येते. ५८ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड ही गाडी गाठता येईल. ऍपद्वारे कनेक्टटेड फीचर्स देखील या गाडीमध्ये मिळतात. या गाडीची किंमत ओकिनावा आय – प्रेज – रुपये १.२३ लाख पासून आहे.

एथर ४५०x – ही गाडी एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी आणली आहे. ही एक स्पोर्टी परफॉर्मन्स देणारी इलेक्ट्रिक स्कूटर असून याआधी लाँच करण्यात आलेली एथर ४५० ही देखील अतिशय लोकप्रिय झाली होती. एका संपूर्ण चार्ज मध्ये ही ६०-८५ किमी एवढे अंतर पार करू शकते. या गाडीची किंमत १.४९ लाखांपासून आहे.

रिव्हॉल्ट ४०० आणि रिव्हॉल्ट ३०० – मायक्रोमॅक्स या कंपनीने देखील इलेक्ट्रिक गाडी बनवण्याच्या शर्यतीत उडी घेतली आहे. रिव्हॉल्ट नावाने एक नवीन ब्रँड त्यांनी स्थापन केला असून दोन मॉडेल त्यांनी लाँच केले आहेत. रिव्हॉल्ट ४०० आणि रिव्हॉल्ट ३०० अशी या इलेक्ट्रिक बाइक्सची नावे आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये बॅटरी क्षमता आणि काही फीचर्स इतकाच फरक आहे.

रिव्हॉल्ट ४०० मध्ये ३.२४ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८० – १५० किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करते. ८५ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येतो. रिव्हॉल्ट ३०० मध्ये २.७ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८०- १८० किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करते. या गाडीची किंमत रिव्हॉल्ट ४०० – रुपये १.३० लाखापासून, रिव्हॉल्ट ३०० – रुपये १.११ लाखांपासून आहे.

बजाज चेतक – ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. बजाज चेतक मध्ये ३ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८५ – ९५ किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करता येईल. ७८ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येईल. या गाडीची किंमत १.२० लाखांपासून आहे.

टीव्हीएस I-Cube – हे दुचाकी वाहन निर्मात्यांमध्ये आणखी एक मोठे नाव आहे. त्यांनी नुकतीच I-Cube ही गाडी बाजारात आणली आहे. ही गाडी ७५ किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्जमध्ये पार करते. बॅटरी १००% चार्ज होण्यास ५ तास इतका वेळ लागतो. ७८ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येईल. या गाडीची किंमत टीव्हीएस I-Cube – रुपये १.१५ लाख पासून आहे.

या गाड्या आपल्याकडे चांगला पर्याय म्हणून आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर जर आपण गाडी घेयचा विचार करत असाल तर प्रदूषण मुक्त या गाड्या घेऊ शकता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.