पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  

मुंबई | कोरोना महामारीनंतर सर्वांसमोरच आर्थिक संकट उभा राहिले आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. अशा परिस्थितीत बाईक किंवा स्कूटर विकत घेणाचा विचार करणाऱ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर चांगला पर्याय बाईक घेणाऱ्या ग्राहकांच्या समोर आहे.

एक लिटर पेट्रोल शंभरची नोट खर्च केल्याशिवाय मिळत नाही. तसेच पेट्रोलच्या दरात सतत वाढ होताना पाहायला मिळते आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाचे ओझे वाढले आहे. पेट्रोल स्कूटरपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रवास कमी खर्चात होणार आहे.

अनेक इलेक्ट्रिक स्कूटर किंमत जास्त आहे. परंतु बऱ्याच स्वस्त स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. येथे तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरविषयी माहिती मिळणार आहे.

अँपिअर व्ही ४८ एलए या स्कूटरची किंमत २८,९०० रुपये आहे. या स्कूटरचा कमाल वेग २५ किमी आहे. तर एकदा चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर ५० किमीचा प्रवास करू शकता.

देशातील स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओकिनावा या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची Ridge ही पहिली स्कूटर आहे. तिचा ताशी वेग ६० किमी आहे. तर या स्कूटरची किंमत ४४,९९० रुपये आहे.

हिरो कंपनीची ऑप्टिमा स्कूटर अलिकडे खूपच लोकप्रिय होत आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर स्कूटर ५० किमीपर्यंत धाऊ शकते. ही स्कूटर तीन रंगात उपलब्ध आहे. याची किंमत ४१,७७० रुपये आहे.

टीव्हीएसची एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उपलब्ध आहे. देशात या स्कूटरची किंमत १.१५ लाख आहे. परंतु ही स्कूटर फक्त ४.२ सेकंदात ताशी ४० किमीच्या वेगाने धावते.

महत्त्वाच्या बातम्या-
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? वाचून थक्क व्हाल
दमदार आणि आकर्षक लूकमध्ये महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत आहे फक्त
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.