‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामुळे देशात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे बाजारात आहे अनेक इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत. यामुळे आपला फायदा होणार आहे. आता सिंगल चार्जिंगमध्ये जबरदस्त रेंज मिळत आहे. या इलेक्ट्रीक कारद्वारे तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकतात, शिवाय खर्चही कमी लागतो.

जर तुम्हीही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त असाल आणि एक स्वस्त व परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा पर्याय शोधत असाल तर अशा गाड्या उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात भारी पर्याय म्हणजे, Hyundai Kona ही देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये ३२.९ kwh ची बॅटरी असून याद्वारे ही कार केवळ ९ सेकंदात १०० kmph चा वेग पकडते. यामुळे इतर गाड्यांना देखील ही टक्कर देते.

तसेच ही गाडी पूर्ण चार्ज झाल्यानंतर नवीन Kona इलेक्ट्रिक एसयूव्ही तब्बल ४५२ किमीची रेंज देते, असे कंपनीने सांगितले आहे. या कारमध्ये ६-एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्टसह रीअर कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे.

कोना भारतात विक्री होणारी सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार आहे. भारतात कोना एसयूव्हीची किंमत २३.७२ लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र या गाडीचे फायदे देखील तसेच आहेत. यामुळे ही गाडी परवडते.

तसेच अजून एक गाडी म्हणजे, MG ZS EV एमजी झेड एस ईव्ही यातील इलेक्ट्रिक मोटर १४१ bhp पॉवर आणि ३५३ Nm पीक टॉर्क निर्माण करते. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ३४० किलोमीटरपर्यंत प्रवास करते. कारची बॅटरी वॉटर आणि डस्ट प्रूफ असून कंपनीचा दावा झेडएस ईव्ही फक्त ८ सेकंदात ०-१०० किलोमीटर प्रति तास स्पीड पकडते.

बॅटरी चार्जरने ४० मिनिटात ८० टक्के चार्ज होते, तर स्टँडर्ड ७.४ kW चार्जरद्वारे जवळपास ७ तासांचा वेळ लागतो. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीसोबत ७.४ kWh चार्जर देते. यामुळे ही गाडी एक उत्तम पर्याय आहे. या गाडीची भारतीय किंमत १९.८८ लाख रुपयांपासून सुरू होते.

ताज्या बातम्या

कंगना लुटतेय पावसात घोडेस्वारीचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.