फोर्डच्या या इलेक्ट्रिक कारने बाजारात घातला धुमाकूळ, एका दिवसात झाल्या २० हजार बुकिंग

मुंबई | मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठमोठ्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचे आकर्षक आणि दमदार मॉडेल बाजारत लाँच करत आहेत. नामांकीत फोर्ड या कंपनीच्या Ford F 150 Lightning या कारने बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फोर्डच्या या शानदार कारला अवघ्या २४ तासात २० हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनसुद्धा या कारमध्ये बसले आहेत. Ford F 150 लाइटनिंग या कारची किंमत ३९,९७४ डॉलर्स(२९,१४,७७८) इतकी आहे. ही कार बाजारत आल्यानंतर आता फोर्ड कंपनी सध्या फोक्सवॅगन आणि टेस्लासारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे.

या ट्रकमध्ये दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. या ट्रकचं स्टँडर्ड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे ३७० किमीपर्यंतचा प्रवास करु शकतं. तर त्याच एक्सटेंडेंड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे ४८३ किमीपर्यंत प्रवास करू शकतं.

या गाडीची बॅटरी १० मिनिटात इतकी चार्ज होते की हा इलेक्ट्रिक पिक-अप ट्रक ८७ किलोमिटरपर्यंतच अंतर कापू शकतो. याशिवाय गाडीची बॅटरी केवळ ४१ मिनिटांत १५ ते ८० टक्के चार्ज होते.

फोर्डच्या या पिकअपमध्ये स्टँडर्ड बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे हा पिकअप सिंगल चार्जमध्ये ३७० किमी धावतो. ही गाडी ५६३ bhp पॉवर आणि १०००Nm टॉर्क जनरेट करते.

गाडीत १५ इंचाची इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहे. तर १२ इंचाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. हा पिकअप ट्रक ४.५ सेकंदात १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकतो. ट्रकच वजन २,२६७ इतके आहे.

महत्वाच्या बातम्या-
जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..
भन्नाट इलेक्ट्रिक सायकल, अवघ्या ५० रुपयात चालते १००० किलोमीटर; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
धक्कादायक! लसींमुळेच निर्माण होतायत कोरोनाचे नवे व्हेरिएंट, प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञाचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.