मोठी बातमी! इलेक्ट्रिक दुचाकी होणार स्वस्त, मोदी सरकारने अनुदानाची रक्कम वाढवली

नवी दिल्ली । पेट्रोल डिझेलचे वाढते दर, प्रदूषण, यामुळे आता इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक दुचाकी आता अधिक स्वस्त होणार आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला चलना मिळावी, या उद्देशाने सरकारने अनुदान वाढविले आहे. यामुळे याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.

आता या निर्णयाचा परिणाम किंमती कमी होण्यावर झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनाकडे पाहिले जात आहे. अनेकजण आता याच गाड्या खरेदी करत आहेत.

या निर्णयामुळे सर्वसाधारणपणे अशा दुचाकींचा किंमत १५ हजार रुपयांनी कमी होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वापरल्यास इंधनाची गरज भासणार नाही. तसेच कार्बन उत्सर्जन, ध्वनी प्रदूषण होणार नाही. यासह याचे अनेक फायदे आहेत.

हा निर्णय घेताना केंद्र सरकारने सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.यामध्ये अनेक गाड्या एकदा चार्ज केल्यावर १०० किलोमीटर अंतर कापत आहेत. यामुळे मोठा फायदा होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. यामुळे केंद्र सरकार विरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. यामुळे केंद्र सरकारने याबाबत इलेक्ट्रिक गाड्यांवर अनुदान वाढवत काहीसा दिलासा दिला आहे.

यामुळे आता या गाड्यांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. चारचाकी गाड्यांमध्ये देखील काही इलेक्ट्रिक गाड्या काही प्रमाणात बाजारात येऊ लागल्या आहेत. पेट्रोल डिझेलवर हा एक चांगला पर्याय आहे.

ताज्या बातम्या

मूर्खपणाचा कळस! वाहत्या पाण्यात तरुणाचा बाईक स्टंट, पहा थरारक व्हिडिओ…

‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

जेनेलियासोबत रोमान्स करता करता रितेशने केला दुसऱ्याच कोणाला किस; पहा पुढे काय घडलं..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.