पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल

नवी दिल्ली | पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दररोज पेट्रोलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. पण आता भारतात रस्त्यावर इलेक्ट्रिक सायकल धावताना दिसणार आहे. Nexzu Mobility कंपनीने इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. चला तर मग जाणून घेउयात सायकलीबद्दल…

Nexzu Mobility कंपनीने भारतात इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करत वाढत्या पेट्रोलच्या दरापासून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनाने Nexzu Roumps+ ही इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे. या सायकलचा इलेक्ट्रिक स्कूटर आणि साधी सायकल असा दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो.

अडीच ते तीन तासामध्ये ही इलेक्ट्रिक सायकल चार्ज होते. आणि यामध्ये पुढे आणि मागे इलेक्ट्रिक डिस्कब्रेक दिले आहेत. तसेच रायडिंग करणाऱ्यांसाठी स्लो, फास्ट आणि मीडियम असे तीन पर्याय दिले आहेत.

सायकलमध्ये पॉवरसाठी 5.2 एएच बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर BLDC 250W 36V ची मोटर जोडलेली आहे. याची किंमत बाजारात 31,980 रूपये ठेवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-

‘या’ कंपनीकडून वाहन विमा घेऊ नका, IRDAI चा सावधगिरीचा इशारा
२३ वर्षाच्या वयात ‘हा’ मुलगा कमवतोय लाखो रुपये, फक्त एका भन्नाट कल्पनेच्या जीवावर
क्रिकेटपटूंचे बंड! १८ शतक झळकवणाऱ्या सलामीवीरासह १५ खेळाडू देश सोडणार
टीव्ही, फ्रीज आणि दुचाकी असणाऱ्यांचे बीपीएल कार्ड होणार रद्द; सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.