Share

Zarkhand : ब्रेकींग न्युज! मुख्यमंत्र्यांची आमदारकी रद्द; निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे शिफारस

Election Commission of India

Zarkhand : झारखंडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे अहवाल सादर करत त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत हेमंत सोरेन यांनी त्यांच्या भावाला दगडखाणी लीजवर दिल्या असल्याचा आरोप भाजपणे केला होता. यासाठी त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे केली होती. ही मागणी झारखंड राज्य भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९A अंतर्गत केली होती.

मुख्यमंत्रीपदाबरोबरच हेमंत सोरेन यांच्याकडे खनिज मंत्रालयाचाही कार्यभार त्यांच्याकडे आहे. २२ ऑगस्ट रोजी हेमंत सोरेन यांचा समावेश असलेल्या खाण लीज प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोगात पूर्ण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे.

निवडणूक आयोगाने यासंबंधीचा अहवाल सादर केला असून हेमंत सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. झारखंडचे राज्यपाल सध्या रांचीमध्ये नाहीत. दुपारी २ वाजता ते रांचीला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोरेन यांच्याबद्दलचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यपालांच्या निर्णयानंतर हेमंत सोरेन यांना कधीही मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते. हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होत असूनही मुख्यमंत्रीपद सोरेन कुटुंबाकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. हेमंत सोरेन त्यांच्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवण्याची शक्यता आहे.

मागील शनिवारी याबाबत बैठकही झाली होती. त्यावेळी हेमंत सोरेन यांच्या पत्नीकडे राज्याची जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नीच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु असल्याचे भाजप नेते निशिकांत दुबे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Cricket : आशिया चषकात रंगणार भारत – पाकीस्तान महामुकाबला; ‘असा’ पाहता येईल मोबाईलवर LIVE
Congress President : ‘सोनिया गांधीच सांभाळणार २०२४ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्षपद’, सर्व नेत्यांनी चर्चेमध्ये केली ‘ही’ मागणी
Dahaihandi: दहीहांडीत गोविंदाचा पडून मृत्यु, आईने फोडला टाहो, म्हणाली, सरकारकडून मिळालेल्या मदतीचं..
Politics: शिंदे गटाने वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेंशन, निवडणूक आयोगाला पाठवली तब्बल दीड लाख प्रमाणपत्र

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now