कोरोना रूग्णांबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

 

नवी दिल्ली | देशात सुरू असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षा वरील नागरिक आणि कोरोना रुग्णांना बैलेट पेपरच्या साह्याने मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पोस्टल मतदानाद्वारे मतदान करु शकणार आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू होणार आहे.

याआधी पोस्टल मतदान करण्याचा अधिकार ८० वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या लोकांना तसेच दिव्यांगांना होता. मागील वर्षी २२ ऑक्टोंबरला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ८० वर्षावरील आणि दिव्यांगांना पोस्टल मतदानाची सुविधा देण्यात आली होती.

यावेळी मतपत्रतून मताधिकार देण्यासाठी १९६१ च्या कायद्यात दुरुस्ती करून त्यांना अनुपस्थित मतदार या श्रेणीमध्ये सामावून घेण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.