अमरावतीत भावानेच भावाचा खुन केल्याची घटना घडली आहे. धाटक्या भावाने आपल्या आधीच प्रेमविवाह केला. त्यानंतर सामाजिक बदनामी झाल्याची भावना मोठ्या भावाच्या मनात आली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये बाचाबाची झाली. नंतर वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये हाणामारी झाली.
या हाणामारीत थोरल्याने धाकट्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला आणि त्याला मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नांदगाव येथील खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
सुधीर चरणदास घरडे (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलीसांनी सतीश उर्फ सचिन चरणदास घरडे (वय २७) या व्यक्तीला म्हणजेच मृत व्यक्तीच्या मोठ्या भावावर खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीरने काही महिन्यांपुर्वीच प्रेमविवाह केला होता. थोरला भाऊ सचिन याला ते मुळीच पटले नाही. त्यावरून तो सचिनसोबत नेहमी वाद घालायचा. त्या दोघांची यावरून नेहमी भांडणं व्हायची. याच कारणावरून दोघा भावांमध्ये घराच्या समोरच वाद झाला.
या वादात सचिनने सुधीरवर धारधार शस्त्राने हल्ला चढवला. सुधीर रक्तबंबाळ होऊन जमीनीवर कोसळला. त्यानंतर सचिन तेथून फरार झाला. हा प्रकार सुधीरची पत्नी कशीश (वय १९) हिच्या ध्यानात आला. त्यानंतर तिने तातडीने सुधीरला नातेवाईकांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
त्यानंतर तेथून सुधीरला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पोटाला दोन जखमा झाल्या होत्या. त्याच्या पोटावर वार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पोटावर दोन वार झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीला शोधण्यासाठी दोन पथक रवाना झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
जागच्या जागी मुंबईतील १० जणांचं कुटूंब संपलं; अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल
“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण…”
होंडाने आणली भन्नाट बाईक! एक लीटरमध्ये जाते तब्बल १०० किलोमीटर; वाचा फिचर्स
गिलच्या द्विशतकावर फेरणार होते पाणी; पण रोहितच्या ‘या’ जबरदस्त चालीमुळे भारताचा थरारक विजय