भाऊ तुषार कपूरला अटक करण्यासाठी एकता कपूरने बोलवले पोलीस; जाणून घ्या पुर्ण किस्सा

छोट्या भावा आणि बहीणीसोबत सगळ्यांचे भांडण होत असताना. लहानपणी तुमचे तुमच्या छोट्या भावा बहीणीसोबत भांडण झाले नसतील असा एकही दिवस नसेल. पण कधी तुम्ही भावा बहीणीसोबत भांडण झाले म्हणून पोलीसांना बोलावले आहे का?

असे कधीच होणार नाही की तुमचे तुमच्या भावा बहीणीसोबत भांडण झाले आणि तुम्ही पोलीसांना बोलावले. जी गोष्ट कुठेच होत नाही ती गोष्ट बॉलीवूडमध्ये होत असते. बॉलीवूडमध्ये एका भावा बहीणीची जोडी अशी आहे ज्यांच्या भांडणामूळे पोलीस घरी आले होते. जाणून घेऊया कोण आहेत ते.

हे भाऊ बहीण दुसरे तिसरे कोणी नसून तुषार कपूर आणि एकता कपूर आहेत. दोघे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. जितेंद्रचे दोन्ही मुलं एकता आणि तुषार आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहेत. दोघांनी स्वत च्या मेहनतीने बॉलीवूडमध्ये यश मिळवले आहे.

भावा – बहीणीची ही जोडी इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे बॉन्डिंग खुपच चांगले आहे. करिअरमध्ये फ्लॉप झाल्यानंतर तुषार कपूर सध्या बहीण एकताच्या निर्मिती कंपनीमध्ये काम करत आहे. दोघे मिळून बालाजी टेलिफिल्मस नावाची निर्मिती संस्था चालवतात.

आज एकमेकांना समजून घेऊन एकत्र आयूष्य जगणारे तुषार आणि एकता एकेकाळी खुप भांडण करत होते. त्यांना एकमेकांसोबत राहणे देखील पसंत नव्हते. त्यांच्या भांडणामूळे घरातले वैतागले होते. एकदा तर तुषार कपूरला कंटाळून एकताने पोलीसांना बोलावले होते.

त्याचे झाले असे की, तुषार आणि एकता कुटूंबासोबत तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. तिथे गेल्यानंतर जितेंद्र त्यांना हॉटेलच्या रुमवर सोडून बाहेर गेले होते. ते गेल्यानंतर तुषार आणि एकतामध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. दोघे खुप जास्त भांडू लागले.

याच भांडणामध्ये तुषारने एकताच्या नाकावर बुक्की मारली. त्यामूळे तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. रक्त आल्यानंतर एकता रडू लागली. रडत रडत एकताने हॉटेलमध्ये फोन केला आणि सांगितले की, तुषारने माझे नाक तोडलं आहे. तुम्ही पोलीसांना बोलवा.

हे ऐकल्यानंतर हॉटेलच्या स्टाफला धक्का बसला. त्यांनी पोलीसांना न बोलवता जितेंद्रला या गोष्टीची माहीती दिली. हे समजल्यानंतर जितेंद्र धावत रुममध्ये गेले आणि त्यांनी दोघांचे भांडणं थांबवले. त्यांनी एकता आणि तुषारला शांत केले.

पण चिडलेली एकता काहीही ऐकायला तयार नव्हती. ती हट्ट करुन की, तिला तुषारला पोलीसांमध्ये द्यायचे आहे. तो तिला खुप त्रास देतो. हे ऐकल्यानंतर जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीला हसायला आले. त्यांनी एकताला नीट समजून सांगितले आणि तिचा राग कमी केला.

महत्वाच्या बातम्या –
‘जुबेदा’ चित्रपटानंतर करिश्मा कपूरचे कौतूक झाले तर मनोज बाजपेयीला सावळ्या रंगामूळे ठेवण्यात आली नाव
ट्विंकल खन्नामूळे करणं जोहरने त्याचा जीव धोक्यात घातला होता; वाचा पुर्ण किस्सा
कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला झाला आनंद; म्हणाली…
मिसेस कोहली बनण्यापूर्वी अनूष्का शर्माचे होते अनेक अफेअर्स; नाव वाचून धक्काच बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.