वडीलांच्या ‘त्या’ एका अटीमूळे आजही एकता कपूर आहे अविवाहीत

इंडियन टेलिव्हिजनवरील सर्वाच चर्चित नाव म्हणजे एकता कपूर. एकताला टेलिव्हिजन क्वीन देखील बोलले जाते. एकता गेले अनेक वर्ष टेलिव्हिजनवर काम करत आहे. तिने आजपर्यंत अनेक हिट मालिका दिल्या आहेत. एकताने टेलिव्हिजन आणि बॉलीवूडला अनेक मोठे स्टार दिले आहेत.

करण पटेल, दिव्यांका त्रिपाठी, सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे अशा अनेक कलाकारांना तिने इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केले आहे. टेलिव्हिजनवर एकताने अनेक प्रेम कहाण्या, कौटूंबिक कहाण्या बनवल्या. अनेकांना प्रेमात पाडणारी एकता अजूनह सिंगल आहे.

एकता कपूर अभिनेता जितेंद्रची मुलगी आहे. तिचे वय ४१ वर्ष आहे. ४१ वर्षांची एकता अजूनही अविवाहीत आहे. एकता सरोगेसीच्या मदतीने एका मुलाची आई झाली आहे. तिच्या मुलाचे नाव रवी आहे. ती सध्या सिंगल मदर बनून तिच्या मुलाचा सांभाळ करत आहे.

एकता कपूर सुंदरतेमध्ये बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देत असते. पण तरीही ती अविवाहीत आहे. तिला अनेकदा लग्नावरुन प्रश्न विचारले जातात. एवढे वय झाले तरी तु अजूनही लग्न का केले नाही या प्रश्नाचे उत्तर देत तिने हे रहस्य उघड केले आहे.

एकता कपूर म्हणाली की, ‘मला लग्न करायचे नव्हते म्हणून मी अविवाहीत आहे. मी वयाच्या २२ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी गोष्टी खुप चुकीच्या झाल्या. मी ज्या व्यक्तिवर प्रेम करत होते. त्या व्यक्तिने मला धोका दिला. तेव्हापासून आजपर्यंत मला योग्य जोडीदार मिळाला नाही’.

त्यासोबतच एकता कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘ती तिच्या वडीलांमूळे आजपर्यंत अविवाहीत आहे. ती म्हणाली होती की, ज्या वेळी मला लग्न करायचे होते. त्यावेळी माझ्या वडीलांनी माझ्यासमोर एक अट ठेवली होती. त्यांनी मला सांगितले होते की, एक तर मी लग्न करावे किंवा काम. या दोन्हींमध्ये मी कामाची निवड केली. त्यामूळे मी अविवाहीत आहे’.

महत्वाच्या बातम्या –

‘ही’ आहे जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी; सुंदरतेमध्ये देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर

राजकूमार यांनी हेमा मालिनीला लग्नासाठी प्रपोज केले होते; ‘हे’ कारण सांगत लग्नाला दिला होता नकार

शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची झाली आहे ‘अशी’ अवस्था; घर चालवण्यासाठी करते ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.