ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग, अवघ्या 20 हजारात लाखोंचे उत्पन्न

मुंबई | असं म्हणतात की, एखादी गोष्ट जिद्दीने करायची म्हणलं तर या जगात काहीच अशक्य नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहे. खरतर पेशाने शिक्षक असलेल्या या शेतकऱ्याने शेतात ड्रॅगन फ्रूटची लावगड करून अनोखा प्रयोग केला आहे.

जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगावचे एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतात एक नवीन प्रयोग केला आहे. कमीतकमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळाल्याने सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. पेशाने शिक्षक असलेल्या एकनाथ मुळे यांनी नोकरी करता करता एका एकरात ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे.

याबाबत शेतकरी एकनाथ मुळे यांनी सांगितले की, या पिकाच्या लावगडीला सुमारे २० हजारापर्यंत खर्च झाला आहे. याचबरोबर या पिकाची लावगड केल्यापासून दीड वर्षातच पिक येण्यास सुरुवात झाली. दुसऱ्याच वर्षाला या पिकातून सुमारे २ टन उत्पन्न मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विशेष बाब म्हणजे यांनी हा माल व्यापाऱ्याला न देता थेट ग्राहकांना दिला. एकनाथ मुळे यांनी हा माल ग्राहकाला थेट २०० रुपये प्रतीकिलो दराने विकला. यामधून त्यांना जवळपास साडे तीन ते चार लाखांचा नफा मिळवला. तसेच मिळालेल्या नफ्यातून लावगडीचा खर्च निघाला आहे.

दरम्यान, तरुण शेतकऱ्यांना सल्ला देताना मुळे सांगतात की, शेतात नवनवीन प्रयोग केले पाहिजे. याचबरोबर पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती करण्यासाठी तरुण वर्गाचा कल असावा. यामुळे कमी खर्चातून अधिकाधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर महेश भट व मुकेश भट यांनी मांडली त्यांची बाजू; म्हणाले..

धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्माला भारतीय संघातून वगळण्याचे कारण समोर आलेच; वाचा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.