आता मी भाजपला माझी ताकद दाखवून देतो; नाथाभाऊ कडाडले

मुंबई | अनेक वर्षे भाजपचे काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी फक्त प्रवेश न करता अनेक कार्यकर्ते आणि नेते यांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करत आहेत. खडसे यांच्या जाण्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

अशातच आता खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला जळगावमध्ये खिंडार पडले आहे. जळगाव जिल्ह्यातील ६० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. यामुळे भाजपच्या गडाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.

रावेर तालुक्यातील ६० भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना खडसे यांनी भाजपला लक्ष केले आहे. ‘आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल,’ असे खडसे यांनी म्हंटले आहे. याचबरोबर जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले आहे. याचबरोबर हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, ‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम असल्याचे देखील खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल
…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील
सुशांत प्रकरणाला वेगळे वळण! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर केला धक्कादायक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.