Share

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिंदे गटातील आमदारांची आज एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची या बैठकीमध्ये मुख्यनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.(Eknath Shinde’s big blow to Uddhav Thackeray, Sena’s new national executive announced)

पक्षप्रमुख पदासंदर्भात या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या या बैठकीमध्ये शिवसेनेचे काही खासदार देखील उपस्थित होते. शिवसेनेचे १४ खासदार ऑनलाइन पद्धतीने या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

आज शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य प्रवक्ते पदावर दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमधील काही महत्वाच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उपनेतेपदावर यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, विजय नाहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील, तानाजी सावंत, शरद पोंक्षे आणि उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बैठक झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार योगेश कदम म्हणाले की, “खासदारांबद्दल काय निर्णय झाला याबद्दल एकनाथ शिंदे बोलतीलच. मी याबाबत भाष्य करणार नाही. आमच्या बाबतीत अफवा पसरवण्यात आल्या आहेत. मुळात आम्ही राजीनामा दिला आहे. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत”, असे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.

या नवीन कार्यकारिणी संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. शिंदे गटाने भाजपला सोबत घेऊन नवीन सरकार स्थापन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘मोदी भक्तांची अडचण आहे की ते अशिक्षीत आहेत, ते माझ्या PHD शी स्पर्धा करू शकत नाहीत’
कोहलीपेक्षा वयाने लहान तरीही घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला, कृपया आजपासून…
शिवसेनेत मोठा भूकंप! तब्बल १४ खासदार जाणार शिंदे गटात; दिल्लीत यादी तयार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now