Share

Eknath Shinde : “पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांना…” PFI वरील बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान!

Eknath Shinde

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात १० जिल्ह्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएने छापे टाकले होते. त्यानंतर आता देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी आणण्यात आली आहे. या प्रकरणावर अनेक नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पीएफआय या संघटनेवरील बंदीविषयी बोलताना ते म्हणाले की, पीएफआय सारख्या देशविघातक आणि देशद्रोही संघटना या आपल्या देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे.

तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जी बंदी घातली ती योग्यच आहे. कुठल्याही परिस्थितीत या देशात आणि राज्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे हे अयोग्य आहे. त्यामुळे ज्यांनी या घोषणा दिल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पीएफआयवरील ही बंदी योग्यच आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या देशात राष्ट्रदोही, देशद्रोही विचार कोणालाही पसरवता येणार नाही आणि ते पसरवूही दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे सरकारने योग्य तोच निर्णय घेतला आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यात शिवसेना, भाजप युतीचे सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन केले आहे. हे सरकार या राज्याला पुढे घेऊन जाणार आहे. या राज्यात सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार केला जाईल. तसेच या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचाही विचार केला जाईल.

तसेच या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आम्ही कमी कालावधीत खूप मोठे निर्णय घेत आहोत आणि ते लोकांना आवडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक येथील स्वामीनारायण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या
PFI : २०४७ पर्यंत भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा PFI चा प्लॅन; माजी पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
Pune: दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे; पुण्यात मनसे आक्रमक, काय आहे नेमकं प्रकरण?
raj thackeray : पुण्यात पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राज ठाकरे भडकले; मोदींकडे केली ‘ही’ मागणी 
raj thackeray : तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत; राज ठाकरेंनी ठणकावले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now