Homeताज्या बातम्याकोरोना झाला तरी शिवसेनेचा वाघ लोकांसाठी झटतोय, एकनाथ शिंदेंनी थेट रुग्णालयातून घेतला...

कोरोना झाला तरी शिवसेनेचा वाघ लोकांसाठी झटतोय, एकनाथ शिंदेंनी थेट रुग्णालयातून घेतला परिस्थितीचा आढावा

राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. तसेच राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे रुग्णालयात असतानाही आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावेत अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. एकनाथ शिंदे यांना कोरोना झालेला असतानाही ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

एमएमआर क्षेत्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रुग्णालयातून व्हिसीद्वारे सहभागी होत संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी आढावा एकनाथ शिंदेंनी घेतला. एमएमआर क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना एमएमआर क्षेत्रातील सर्व मनपा आयुक्तांना त्यांनी दिल्या.

कोविड केंद्र, त्यातील मनुष्यबळ, ऑक्सिजन तसेच औषधांची उपलब्धता, रुग्णवाहिकांची सोय याचा आढावा घेतला. होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग तसेच सार्वजनिक ठिकाणी राज्य आणि केंद्र शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचा सूचना देत मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासमयी निर्देशित केले.

ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच लहान मुले यांना ओमायक्रोनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यांना स्टेबल करून त्यानंतरच इतर रुग्णालयात हलवावे याबाबत खासगी रुग्णालयांना सूचना देण्याबाबत निर्देश दिले. यावेळी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या
टाटाने खेळला मोठा डाव! एकेकाळी ज्या गाडीने मार्केट गाजवलं ती कार आणणार इलेक्ट्रीक रूपात
ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य
खूप वर्षांनंतर धर्मेंद्रच्या घरी अचानक पोहोचली मुमताज, पहिली पत्नी ‘प्रकाश’ने केले जोरदार स्वागत
राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना बंदी; यापुढे करावा लागणार डिजिटल प्रचार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय