Share

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना पंढरपूरचा पांडुरंग पावला; पंढरपुरात मिळाला बंडानंतरचा पहीला विजय

Eknath-Shinde

एकनाथ शिंदे  (Eknath Shinde): राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राज्याच्या राजकीय परिस्थितीत अनेक बदल होताना दिसत आहे. हा बदल आता ग्रामीण भागापर्यंत पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने प्रथमच पंढरपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंढरपूर येथे शिंदे गटाने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या टाकळी ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक असेलेले महेश साठे यांनी सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोलापूर येथील पहिली ग्रामपंचायत मिळाली आहे.

मुख्य म्हणजे शिंदे गटाने १४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने टाकळी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील टाकळी ही शिंदे गटाला सत्ता मिळालेली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

या निवडणुकीमध्ये शिंदे गटाने शिंदे समर्थक संजय देविदास साठे, रेश्मा संजय साठे, रोहिणी महेश साठे यांच्यासह १४ जागांवर विजय प्राप्त केला आहे. यावर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी टाकळी येथे राज्यातील पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर टाकळी येथे झालेल्या या निवडणुकीमध्ये शिंदे गटाने विजय मिळवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पांडुरंग पावला, असे तालुक्यात बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दौरे केले. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थनही दिले. सोबतच इतर पक्षातील अनेक नेत्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवून एकनाथ शिंदेंनी शिंदे गटाचा झेंडा रोवला आहे.

महत्वाच्या बातम्या
सर्पदंशाने झाला होता भावाचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या दुसऱ्या भावाचाही सर्पदंशानेच मृत्यू
Driver: स्वतः मृत्यू पत्करला पण वाचवले २५ प्रवाशांचे प्राण; एसटी चालकाची डोळ्यांत पाणी आणणारी स्टोरी
Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंची जागा घेणार तेजस ठाकरे; उद्धव ठाकरे खेळणार नवा डाव
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडत थेट मर्मावरच बोटं ठेवलं; मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now