Share

Eknath Shinde: ‘सिद्धेशवर कारवाई व्हायलाच हवी’; एकनाथ शिंदेंचा मंचावरून रामदास कदमांच्या मुलाला फोन, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेली एक तत्पर दखल राज्यभर चर्चेत आहे. सभेत नागरिकांकडून वाढत्या कोळसा प्रदूषणाबद्दल तक्रारी ऐकताच शिंदेंनी कोणताही विलंब न करता मंचावरूनच थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Siddesh Kadam) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांना फोन करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

फोनवर बोलताना शिंदे म्हणाले की, “सिद्धेश, मी वणीत आलोय. इथे कोळशामुळे हवा आणि पाणी गंभीरपणे प्रदूषित झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. कारवाई झालीच पाहिजे.” त्यावर सिद्धेश कदम यांनी अवघ्या २४ तासांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर सभेत उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

सभेची सुरुवात करताना शिंदेंनी 26/11 च्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधान दिनाचे औचित्य साधत लोकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर वणीतील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आणि प्रदूषणाचा प्रश्न या तिन्ही मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले की, “मी शब्द दिला तर मागे हटत नाही. वणीतील समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे.”

कोळसा वाहतूक, रेल्वे सायडिंगमधून होणारी धुळीची उधळण, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे, तसेच ट्रक वाहतुकीमुळे खराब झालेले रस्ते या सर्वांचा उल्लेख करत शिंदेंनी जाहीर केले की वणीसाठी स्वतंत्र बायपास रस्ता मंजूर केला जाईल. तसेच नगरपरिषद निधीच्या गैरवापराच्या तक्रारींवर बोलताना त्यांनी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई होईल असेही स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले की, वणी हे “महिला सबलीकरणाचे शक्तिपीठ” आहे. महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम (Payal Todsam) यांना पाठिंबा देताना ते म्हणाले की, “ही तुमची लाडकी बहीण आहे. विधानसभेत जसा विजय घडवला, तसाच चमत्कार नगरपरिषदेतही घडवा.”

तसेच नागरिकांना आश्वस्त करत त्यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही.” सभा पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod), शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया (Vijay Chordiya), उमेदवार, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थितीत तुफान प्रतिसाद मिळाला.

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now