शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Eknath Shinde Viral video truth)
एकनाथ शिंदे आणि सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. यादरम्यान एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे ‘पिऊन टाईट’ आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ सुरत विमानतळावरील आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर २१ जूनच्या रात्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरतहून गुवाहाटीला विमातळावर निघाले होते. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. सुरतमधील विमानतळावर एकनाथ शिंदे आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.
What’s going on? Is Shinde normal? Can’t walk or even speak? What’s he high on? pic.twitter.com/SL89LYikUe
— Swati Chaturvedi (@bainjal) June 25, 2022
या व्हिडिओची सत्यता तपासली असता एकनाथ शिंदे यांनी मद्यपान केले नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मध्यरात्रीचा असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना झोप अनावर झाली होती. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि या ४६ बंडखोर आमदारांना नवा गट स्थापन करता येणार नाही. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट निर्माण करता येणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्या गटाची काल एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाच्या नवीन रणनिती आखण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काल शिवसेनेच्या कार्यकारिणीची देखील बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, तिकडे आल्यावर तुम्हाला पळता भुई थोडी करू; बंडखोराने फोडली डरकाळी
मी सुशिक्षीत गुंड, तुम्हाला सोडणार नाही; बंडखोर राजेश क्षीरसागरांची पोस्टर फाडणाऱ्यांना धमकी
राष्ट्रवादीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा निष्फळ; बंडखोर आमदार महेश शिंदेंचा आरोप