Share

‘त्या’ व्हिडीओत एकनाथ शिंदे खरच दारूच्या नशेत डुलताहेत का? जाणून घ्या खरं काय….

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना(Shivsena) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(eknath shinde video viral from surat airport)

एकनाथ शिंदे आणि सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. यादरम्यान एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे ‘पिऊन टाईट’ आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ सुरत विमानतळावरील आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर २१ जूनच्या रात्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरतहून गुवाहाटीला विमातळावर निघाले होते. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. सुरतमधील विमानतळावर एकनाथ शिंदे आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.

या व्हिडिओची सत्यता तपासली असता एकनाथ शिंदे यांनी मद्यपान केले नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मध्यरात्रीचा असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना झोप अनावर झाली होती. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/bainjal/status/1540655788162977794?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1540655788162977794%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Feknath-shinde-viral-video-truth%2F

एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि या ४६ बंडखोर आमदारांना नवा गट स्थापन करता येणार नाही. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट निर्माण करता येणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या गटाची काल एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाच्या नवीन रणनिती आखण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काल शिवसेनेच्या कार्यकारिणीची देखील बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘विमानतळावर उतरले की विधानभवनात जाणार रस्ता वरळीतून जातो’; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे दारूच्या नशेत झोकांड्या घेताहेत? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, तिकडे आल्यावर तुम्हाला पळता भुई थोडी करू; बंडखोराने फोडली डरकाळी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now