Share

Eknath Shinde : शेवटपर्यंत आमदार संतोष बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते?, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत गुपित सांगितले

Eknath Shinde Santosh Bangar

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत जाहीर सभा आयोजित केली होती. सोमवारी कावड यात्रेच्या निमित्ताने हिंगोली येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित झाले होते.

संतोष बांगर हे उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे आमदार होते. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी म्हणजेच बहुमत चाचणीच्या दिवशी ते शिंदे गटात सामील झाले. संतोष बांगर हे अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटात का आले याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी या सभेमध्ये केला आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संतोष बांगर हे माझे चेले आहेत. बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. संतोष बांगर बाहेर राहून आमच्यावर टीका करत असल्याने लोकांना त्यांच्याविषयी वेगळे वाटायचे.

तसेच संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात राहून एक-एक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्यवेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या प्रसंगी ते आमच्यासोबत उभे राहिले, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.

यावेळी संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना इशारा दिला आहे. “आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका,” असे ते म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनासाठी १० कोटी रुपयांचा निधी यावेळी जाहीर केला. हिंगोलीतील या सभेमध्ये प्रचंड गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी आमदार संतोष बांगर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

महत्वाच्या बातम्या
…म्हणून भाजपने संजय राठोडांची, त्यांच्या बायका मुलांची आणि संपूर्ण बंजारा समाजाची माफी मागावी
‘तिकडे राहून एक एक आमदार पाठवत होता’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संतोष बांगर यांच्याबाबतचे गुपित फोडले
मंत्री झाल्यानंतर दिपक केसरकर एकदम खुष; प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘बऱ्याच वर्षांनी मंत्रीपद…
मी त्याला कलेक्टर करणार होते पण.., मंत्री शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितला हा खास किस्सा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now