Share

Eknath Shinde : शिंदेची महाविकास आघाडीला धोबीपछाड; शिंदेगट आणि भाजपचे तब्बल १२ आमदार वाढणार

Eknath-Shinde

Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. तसेच त्यांच्यातील संघर्षही वाढला. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे सतत आमनेसामने येत आहेत.

यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. ती यादी आता मागे घेण्याच्या मागणीचे पत्र मागील आठवड्यात एकनाथ शिंदेनी राज्यपालांकडे दिले आहे.

महाविकास आघाडीने १२ नोव्हेंबर २०२० रोजी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये यावरून वादही झाला होता. हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीने पाठवलेली विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून आता राज्यपालांकडे नवीन यादी जाणार आहे.

अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यपालांकडे दोनदा या नावांची यादी महाविकास आघाडीने सरकारने पाठवली होती. परंतु, यासंदर्भात राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. शिंदे-फडणवीस सरकारकडून पाठवण्यात येणाऱ्या यादीत शिंदे गटाचे किती आणि भाजपचे किती आमदार असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेनी पाठवलेलं हे पत्र उद्धव ठाकरेंसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांत विविध मुद्द्यांवरून वाद सुरु आहे. यातच आता हा पुन्हा एक नवीन वादाचा मुद्दा ठरणार का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
पत्नीचे माझ्या साहेबांशी अनैतिक संबंध; पोलीसाचे खळबळजनक आरोप, रंगेहाथ पकडल्याची व्हिडिओ क्लीप केली व्हायरल
‘आमच्या कमळाला तुम्ही बाई म्हणत असाल तर आम्हीपण..,’ कमळाबाईवरून भाजपा संतापली
उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण वाचवले, तुम्ही तर थाळ्या वाजवायला आणि दिले लावायला सांगितले
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक! मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही; वाचा सविस्तर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now