नवी दिल्ली : यावेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच या संदर्भातील निकाल जाहीर केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार असल्याचे या निकालात स्पष्टपणे लिहिले आहे.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाने सर्वात मोठा भूकंप अनुभवला. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेना पक्षात बंडखोरी केली. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना सोबत घेऊन सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी घडल्या.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ताबदल केला. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेला. गेल्या आठ महिन्यांपासून खटला सुरू होता. या संदर्भातील चर्चा निवडणूक आयोगात पूर्ण झाली.
यानंतर निकाल केव्हाही लागणे अपेक्षित होते. त्यानुसार आज सायंकाळी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. हा निकाल ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर शिंदेगटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर ठाकरे गटात शोककळा पसरली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट लढाई पाहायला मिळत आहे. या सत्तासंघर्षामध्ये दोन्ही गटाकडचे वकील आपआपल्या पद्धतीने युक्तिवाद करत आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस असून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तिवाद केला जात आहे.
अशात दोन्ही गटांचा युक्तिवाद सुरु असताना सरन्यायाधीशांनी महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळीप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली.पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहिती होतं, असे विधान सरन्यायाधीशांनी केले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करण्याआधीच न्यायाधीशांनी असे म्हटले आहे.
घटनेच्या दहाव्या सुचीमध्ये बहुसंख्य-अल्पसंख्यांक ही संकल्पना नाही. त्यामुळे तुम्ही बहुसंख्य असलात तरी तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे आम्ही ३४ आहोत असे म्हणण्यात काही अर्थ नाही. यामध्ये एकच मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीणीकरण, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
तसेच पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाला पुढच्या अनेक गोष्टी माहिती होत्या. त्यामुळेच त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस दिली होती. घटनेच्या दहाव्या सुचीचा आधार घेऊन हे सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
फुट सभागृहात पडलीये, शिवसेना पक्षात नाही; सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी आली बाहेर
“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा”; शिवसेना नेत्याने शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत; पहा फोटो
‘बागेश्वरला दिसेल तिथे ठोका’; तुकाराम महाराजांच्या अपमानानंतर भडकलेल्या ‘या’ बड्या नेत्याचे आदेश