Eknath Shinde : शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. यावेळी दोन्ही गटांककडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, हा दसरा मेळावा आणखी एका मुद्द्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी बीकेसी येथील मैदानात एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असताना लोक उठून गेले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यामुळे या सगळ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका टिपण्णी होत आहे. यावर शिंदे गटातील नेत्यांकडून स्पष्टीकरणही देण्यात येत आहे. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणी ते व्हिडीओ व्हायरल केले, ते जाऊ द्या. परंतु, बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? हे शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे, असे ते म्हणाले. तसेच जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर एवढी लोकं समर्थनासाठी आली असती का? असा सवालही त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे वंदनीय आहेत. त्यांना आम्ही आमचे दैवतच मानतो. त्यामुळे कोणी कितीही काही म्हटलं तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असेही ते म्हणाले आहेत.
अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिल्यावर ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी येथील मैदानावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही मेळाव्यांमध्ये चांगलीच फटकेबाजी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : शिंदेच्या मेळाव्यासाठी काळ्या पैशाचा वापर? १० कोटी कुठुन आणले हिशोब द्या; हायकोर्टातून मोठी अपडेट
Uddhav Thackeray: दसऱ्याच्या पावर शो मध्ये एकनाथ शिंदे पडले उद्धव ठाकरेंवर भारी, वाचा नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी दसऱ्याला केली खरी सत्तापालट, उद्धव ठाकरेंच्या छातीत बाणासारखा टोचणार हा वार
Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?