Eknath Shinde : बुधवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चांगलेच धारेवर धरले.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार असतानाचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी सांगितलं की, उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल. त्यानंतर पवार साहेब असं म्हणत आहेत असे तुम्ही मला सांगितलं. त्यावेळी माझ्याजागी दुसरा कोणी असता तर त्याला नक्कीच हार्टअटॅक आला असता. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
मी पदासाठी हपापलेला नाही, मुख्यमंत्री पदासाठी माझा जन्म झालेला नाही. मी एकाच मिनिटात सांगितलं, हो मग काय अडचण आहे? मला कुठे मुख्यमंत्री व्हायचं होत? मी बोललो ते जाऊद्या तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे त्यांनी सांगितले.
तसेच हे सांगणारा दिलदार एकनाथ शिंदे आता तुमच्यासमोर उभा आहे. एकनाथ शिंदेने नेहमी दिलेलंच आहे. हा देणारा आहे घेणारा नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच तुम्ही वर्क फ्रॉम होमवाले आणि आम्ही वर्क विदाऊट होमवाले असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ते आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली आहे, असे म्हणतात. परंतु, अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. मग खरे गद्दार कोण?, असा प्रश्न करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या
Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा
Eknath shinde : एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जागतिक विक्रम?काय घडलं विशेष, वाचा
eknath shinde : एकनाथ शिंदेची खेळी! मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही, वाचा नेमकं काय प्रकरण?