Share

शेतीत कष्ट करणारा अन् शेतकऱ्यांची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, पहा फोटो

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. गुरवारी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला आहे.(Eknath Shinde is a Chief Minister who works hard in agriculture and aware of farmers)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से, महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांचा राजकारणातील वावर सगळ्यांनीच पाहिला असेल, पण त्यांचं गावाकडचं साधं रूप कोणालाही माहिती नसेल. एकनाथ शिंदे आपल्या गावी शेती करतात. शेती करणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे गावचे रहिवासी आहेत. दरे हे गाव फार लहान आहे. हे गाव कोयना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. एकनाथ शिंदे नेहमीच आपल्या गावी जात असतात. एकनाथ शिंदे यांची दरे गावात शेतजमीन देखील आहे. एकनाथ शिंदे यांचे वडील कामाच्या निमित्ताने ठाण्याला आले होते.

त्यावेळी एकनाथ शिंदे फार लहान होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे कुटूंब ठाण्यातच स्थायिक झाले. एकनाथ शिंदे सुरवातीला उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवणारा हा व्यक्ती एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण एकनाथ शिंदे यांनी संघर्ष करत हे दाखवून दिलं आहे.

मागील वर्षी एकनाथ शिंदे या दिवसांमध्ये गावी होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे भात लावणीच्या कामांमध्ये व्यस्त होते. एकनाथ शिंदे यांची हळदीची शेती देखील आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावावर दरे गावात १२.४५ एकर शेतजमीन आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे गावात घर देखील आहे. घराशेजारी एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत.

एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे आमदार आहेत. २००४ सालापासून सलग ४ वेळा एकनाथ शिंदे या मतदार संघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
बाबो! गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी खाल्ले एवढ्या लाखांचे जेवण, वाचा बिलाची यादी
प्रसिद्ध क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अंडरवर्ल्ड डॉनची प्रेयसी, ‘या’ कारणामुळे गेली होती जेलमध्ये
अखेर तो दिवस आलाच! दिनेश कार्तिकला मिळाले टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद, हार्दिक पंड्याला डच्चू

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now