शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. काल एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला आहे.(Eknath Shinde himself had saved small boy’s life in the riots by driving a rickshaw)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से समोर येत आहेत. एकनाथ शिंदे हे सामान्य लोकांना मदत करण्यासाठी ओळखले जातात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याबद्दलचा एक किस्स्सा सांगितला आहे. एकनाथ शिंदे यांनी १९८९ साली एका लहान मुलाचा जीव वाचवला होता.
एकनाथ शिंदे पूर्वी ठाणे शहरातील किसननगर भागात राहायला होते. त्यावेळी एकनाथ शिंदे चाळीत राहायचे. एकनाथ शिंदे उत्पन्नासाठी त्यावेळी रिक्षा चालवायचे. १९८९ साली ठाणे शहरात दंगल उसळली होती. त्यावेळी ठाणे शहरात खूप तणाव पसरला होता. त्यावेळी एका मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्या मुलाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते.
पण बाहेरची परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे त्या मुलाला रुग्णालयात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्या मुलाला आपल्या रिक्षामधून रुग्णालयात पोहचवले होते. यामुळे त्या मुलाचा जीव वाचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा हा किस्सा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सांगितला आहे.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास खुप संघर्षमय आहे. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलू शिंदे होते. काही वर्षांनी त्यांचे कुटुंब साताऱ्याहून मुंबईजवळ ठाण्यात आले. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे.
१९८० च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. आनंद दिघे यांनी त्यांना शिवसेनेत येण्यासाठी मदत केली होती. आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरवातीला शिवसेना शाखा प्रमुख केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. २००४ साली एकनाथ शिंदे आमदार झाले.
महत्वाच्या बातम्या :-
उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार – सर्वोच्च न्यायालयाने झापले
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! मध्यरात्री धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल,’ संजय राऊतांनी केलं भाकित