Eknath Shinde : आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यांनतरचे हे पहिलेवहिले अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासोबतच शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यापैकी कुणाचा व्हीप लागू होणार हे बघणे महत्वाचे आहे. तसेच विरोधी पक्ष शिंदे सरकारला कसे घेरणार आणि शिंदे सरकार विरोधी पक्षाला कसे सामोरे जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
या अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार आहेत. यासोबतच अनेक बाबींवर चर्चादेखील होतील. यावेळी आम्ही घेतलेली भूमिका शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी लागू असेल, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील सुनील प्रभु यांच्या व्हिपला काही अर्थ उरत नाही, असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. या सगळ्यामुळे आज विधानभवनातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सगळ्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना पक्षाने व्हीप जारी केला असून जे आमदार शिवसेना चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना सर्वांना व्हीप पाळावा लागणार आहे, असे अंबदास दानवे यांनी सांगितले आहे.
यावेळी, ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी जरी केलेला व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होईल? की, शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप ठाकरे गटातील आमदारांना लागू होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चुरशीचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Santosh Bangar : कंत्राटदाराला मारल्यांनंतर आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला….
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही, तोपर्यंत… असं म्हणत रतन टाटांनी म्हातारपणाच्या दुःखाला वाट करून दिली
मोदी सरकारचा आदित्य ठाकरेंना मोठा दणका! ५०० कोटींच्या भूखंड वाटपाची होणार चौकशी