Share

Eknath Shinde : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रचंड भडकले एकनाथ शिंदे, पत्रकाराच्या अंगावर धावून जात म्हणाले..

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरे(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य जवळिकीवर माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यावर बोलताना अस्वस्थ झाले आणि पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.

दरेगावातील एका कार्यक्रमात पत्रकारांनी जेव्हा एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी थेट म्हणत टाकले, “जाऊ द्या हे, कामाचं काही आहे का?” आणि यासोबतच “मी इथे राजकीय बोलणार नाही,” असं स्पष्ट करत संवाद संपवला. शिंदेंनी असा संयम सोडलेला दिसणं दुर्मीळ असल्याने ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

पूर्वी झाली होती राज-शिंदे भेट

काही आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावरील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी ही भेट केवळ सदिच्छा असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी(Eknath Shinde) दिलं होतं, मात्र आताच्या घडामोडींनंतर या भेटीमागे काही राजकीय हेतू होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या राज ठाकरे यांनी एकीकडे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याशी जवळीक साधण्याचे संकेत दिल्यामुळे, शिंदेंच्या प्रस्तावाला त्यांनी नकार दिला का, याची चर्चा देखील सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची संतुलित प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis ) यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर संयमित आणि सकारात्मक भूमिका मांडली. “ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्हाला स्वागतच आहे. मतभेद विसरून कोणी एकत्र येत असेल, तर ते चांगलं आहे,” असं म्हणत त्यांनी या शक्यतेला पाठिंबा दिला.

मात्र, माध्यमांच्या सगळ्या घडामोडींवर त्वरित निष्कर्ष काढण्याच्या घाईवर त्यांनी सौम्य टोला लगावत सांगितलं, “माध्यमे खूप लवकर बिटविन द लाईन्स वाचतात. थोडी वाट पाहा. जेव्हा काही ठरेल, तेव्हा सगळं स्पष्ट होईल.”

राजकीय वातावरण तापलेले

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वच पक्ष आपल्या मोर्चेबांधणीला लागलेले असताना, ठाकरे बंधूंमधील संभाव्य युती आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया हे आगामी राजकीय समीकरण ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आता हे मनोमिलन प्रत्यक्षात उतरतं की नाही, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागून राहणार आहे.
eknath-shinde-got-very-angry-on-the-issue-of-thackeray-brothers-coming-together

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now