विधान परिषदेचे मतदान सुरु असतानाच एकनाथ शिंदेनी केलं प्लॅनिंग, धक्कादायक माहिती समोर

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे ११ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे.(Eknath Shinde did the planning while the voting for the Legislative Council started)

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे या ११ आमदारांसोबत सुरतमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे विधान परिषदेचे मतदान सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील योजना आखली असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोन केल्याचे देखील सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे मतदान सुरु असताना आमदारांची जुळवाजुळव करण्यास सुरवात केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना फोन केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल’ झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे ११ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील भाजपचे आमदार हर्ष सांघवी या ११ आमदारांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगितले जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे आमदार फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात होते.

भाजपकडे सध्या १३४ आमदार आहेत. त्यामुळे भाजप अविश्वास ठराव मांडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातमी :-
मुख्यमंत्री आमदारांसोबत बोलत असतानाच एकनाथ शिंदेनी गेम केला, महत्वाची माहिती समोर
एकनाथ शिंदेंना फोन केला तर ऐकू येतेय गुजराती भाषेतील टोन, १३ आमदारांसह शिंदे गुजरातमध्ये?
‘या’ स्टार किड्सना वडिलांकडून मिळाल्या लक्झरी भेटवस्तू, कोणाला ५४ कोटींचा बंगला तर कोणाला कोट्यावधींची कार