Share

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे आपल्या गटाला देणार ‘हे’ अनोखं नाव, नाव वाचून उद्धव ठाकरेही टेंशनमध्ये जातील

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. शिवसेनेच्या गोटात खळबळ माजलेली आहे. आता पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने आपल्या गटाचं नाव ठरवलं आहे अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे.

शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जर तुम्हाला वेगळा गट स्थापन करायचा असेल तर खुशाल करा पण बाळासाहेबांचं किंवा ठाकरे हे नाव वापरायचं नाही.

शिवसेना हे नाव वापरायचं नाही. ठाकरे हे नाव व लावता जगून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण तरीही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. आधीच बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

आता बाळासाहेबांचे नाव गटाला दिल्याने राजकारण आणखी तापू शकते यात काहीच शंका नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. संध्याकाळी एकनाथ शिंदे गटाच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकतात. सध्या शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

आज संध्याकाळी सर्व चित्र स्पष्ट होईल आणि गटाचे नाव हेच आहे का याबाबत अधिकृत घोषणा होईल. दरम्यान, शिवसैनिकांचे म्हणणे आहे की शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव वापरण्याचा कोणताही हक्क नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनाच ते नाव वापरण्याची परवानगी आहे कारण ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत.

शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष मिळून एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार आहेत. हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेची कार्यकारणी बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात येईल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंची फक्त खुर्ची जाणार पण शिवसेनेच्या बंडाचा फटका काँग्रेसला बसणार, जाणून घ्या कसा?
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याने उद्धव ठाकरे अन् शरद पवार अडचणीत, वक्तव्याचा निषेध करण्याची मागणी
मुलगा खासदार, पत्नी उद्योगपती, स्वत: मंत्री, असे आहे एकनाथ शिंदेचे कुटुंब; वाचा संपुर्ण माहिती
बंडखोरांची खैर नाही! शिवसैनिकांचा संयम सुटला; पुण्यात तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now