Share

Eknath Shinde and Uddhav Thackeray: राजकीय उलटफेर! शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कोकणात गुप्त बैठक

Eknath Shinde and Uddhav Thackeray : कोकणातून सध्या एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना, शिवसेना शिंदे गट  आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavli) नगरपंचायतीत दोन्ही गटांमधील नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ही बैठक “शहर विकास आघाडी” (City Vikas Aghadi) या नावाने नव्या आघाडीची चाचपणी करण्यासाठी घेतल्याचं समजतं. माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik), माजी आमदार राजन तेली (Rajan Teli), तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक (Sushant Naik), संदेश पारकर (Sandesh Parker) आणि सतीश सावंत (Satish Sawant) हे या बैठकीला उपस्थित होते. या चर्चेत आगामी नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही गट एकत्र लढण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

शिंदे आणि ठाकरे गट एकत्र?

शिवसेनेच्या फूटीनंतर प्रथमच ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर मतभेद विसरून दोन्ही बाजूंनी एकत्र काम करण्याचा सूर उमटत असल्याचं सूत्रांकडून समजतं. शहर विकास आघाडी (City Vikas Aghadi) अंतर्गत ही युती होण्याची शक्यता आहे. या आघाडीचा नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांचं नाव चर्चेत आहे. पुढील दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते.

राजन तेलींचं स्पष्टीकरण 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितलं की, “कणकवलीतून प्रस्ताव आला आहे की, शहर विकासासाठी सगळ्यांनी मिळून लढावं. मात्र या प्रस्तावावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे. त्यांचा जो निर्णय असेल, त्यानुसारच आम्ही पुढील भूमिका ठरवू.”

ते पुढे म्हणाले की, “हा केवळ एका गटाचा प्रस्ताव नाही. या आघाडीत स्थानिक समाजसेवी मंडळं आणि विविध संघटनादेखील सहभागी होऊ इच्छित आहेत. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली गेली आहे. यात भाजपविरोधी भूमिका नाही, तर विकासाभिमुख विचार आहे.”

उद्धव ठाकरेंचा भूमिकेवरून निर्माण झाला प्रश्न

धाराशिव (Dharashiv) येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, “शिंदे गटासोबत युती होणार नाही.” तरीही कणकवलीतील ही शक्य आघाडी चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक स्तरावर “विकास” या एकाच मुद्द्यावर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होतं.

या चर्चेमुळे कोकणातील राजकारण पुन्हा एकदा गजबजलं आहे. शिंदे-ठाकरे गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. येत्या काही दिवसांत या गटांची भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now