शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(eknath shinde and mla rebbel script It was created two months ago shivsena mla Revealed)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यापूर्वीच तयार करण्यात आली होती, अशी माहिती सध्या समोर येत आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमदारांसोबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजीमुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्या मतदारसंघाला योग्य निधी दिला जात नसल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी केली होती. शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती देखील केली होती.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्रास दिला जातोय,आमच्या कामांची अडवणूक केली जातेय, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली जात नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज होते.
शिवसेनेच्या एका आमदाराने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या आमदारांना योग्य वागणूक मिळत नव्हती. यामुळे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज होते. त्यामुळे एकत्रित सगळ्यांनी बाहेर पडायचे असे नियोजन करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच हे ठरले होते. ”
“जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्या प्रत्येक आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्रास देण्यात आला आहे. कोकणात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांची कन्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ज्या पद्धतीने उभे राहिले. त्याबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेच्या आमदारांनी बहिष्कार देखील घातला होता”, असे शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
दोन महिन्यांपूर्वीच ठरला होता बंडखोरीचा प्लॅन, शिवसेनेच्या आमदाराने सगळंच सांगीतलं; म्हणाला
शिवसेनेत भूकंप! आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं व्यक्तव्य; वाचा काय काय म्हणाले?
राज्यात होणार राजकीय भूकंप! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार मोठा निर्णय; सत्तेतून पडणार बाहेर?