Eknath Shinde : नुकतीच शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात वाजवल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या प्रकरणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना समज दिली असल्याचे बोलले जात आहे.
कामगार विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात बांधकाम कामगारांना मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथील एका उपहारगृहाला संतोष बांगर यांनी भेट दिली असता एक धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. तिथल्या कामगारांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे त्यांनी उघडकीस आणले.
या प्रकाराबद्दल त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला विचारले. परंतु, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतोष बांगर यांचा राग अनावर झाला व त्यांनी सरळ त्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.
मात्र, संतोष बांगर यांच्या या कृतीबद्दल विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत. दुसरीकडे, बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या बाहेर संतोष बांगर यांच्याविरोधात विरोधक घोषणाबाजी करताना दिसले होते.
विधान भवनाच्या पायरीवर उभे राहून विरोधकांनी राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक प्रचंड संतापले होते. विरोधकांची आक्रमकता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा सल्ला आपल्या गटातील आमदारांना दिला.
तसेच मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपले वर्तन व्यवस्थित असले पाहिजे. आपल्याकडून कोणतेही चुकीचे वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला आपल्या गटातील आमदारांना दिला.
महत्वाच्या बातम्या
Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड, चेहराही पडलाय काळा, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
Nitin Gadkari : नितीन गडकरींना हटवण्यामागे भाजपचा काय प्लॅन आहे? महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Vinayak Mete : ..त्यामुळे रोज स्टेटमेंट बदलणाऱ्या मेटेंच्या ड्रायव्हरचीच चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी
“मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं…”, भर सभागृहात निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झाप झाप झापले






