भाजपला खिंडार! एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

मुंबई | भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची मिळत आहे. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खडसेंवर मोठी जबबदारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. खडसे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, याबद्दल मला माहिती नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

पक्षाकडून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर, विधानसभेला तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही खडसेंकडून फडणवीस यांच्यावरच लावण्यात आला होता.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला खिंडार पडणार आहे. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आजपासून सरकार देत आहे डिस्काऊंटवर सोने, ‘या’ किंमतीत मिळणार सोने
एकेकाळी स्वतः रोलर फिरवून खेळपट्टी तयार करण्याचे काम करायचा, आज गाजवतोय IPL
वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने
तुम्हाला माहितीये का तोंडात विरघळणारा कबाब कसा बनवतात, जाणून घ्या रेसिपी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.