नाथाभाऊ गरजले; ‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कोणाचंही नाव न घेता भाजपला इशारा दिला आहे. ‘मागे ईडी लागल्यास मी सीडी लावेन असं म्हटलं होतं. परंतु आता माझी प्रत्यक्षात ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचं काम करणार आहे,’ असे खडसे यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात रात्री संवाद यात्रेदरम्यान बोलताना एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असं मी गमतीनं बोललो होतो. राष्ट्रवादीत प्रवेश करताना जयंत पाटील मला म्हणाले होते की, तुमच्या मागे ईडी लागली तर…? तेव्हा मी म्हटलं सीडी लावेन. आता खरंच लागली मागे ईडी. पण सीडी लावण्याचं काम आता बाकी आहे.’

वाचा काय म्हणाले होते एकनाथ खडसे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले. “मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही.

मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही,” असे म्हणताना खडसे म्हणाले. “मला जयंत पाटील यांनी विचारले होते की, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल. तेव्हा काय कराल? मी म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन,” असेही ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या
बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ
कंगना मागणार का शेतकऱ्यांची माफी? काँग्रेस नेत्यांची धमकी; ‘शेतकऱ्यांची माफी माग नाहीतर…’
भाजपाचा इशारा; ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.